|| Be one with downtrodden and the underprivilged ||
Shri Shivaji Education Society, Karad's - Board for Higher Education, Karad
Venutai Chavan College, Karad
Affiliated to Shivaji University, Kolhapur | NAAC Accredited as "B" Grade (3rd Cycle)
| वर्ष | घटना / माहिती |
|---|---|
| १९२६ | २ फेब्रुवारी रोजी फलटण, जि. सातारा येथे श्री. रघुनाथराव मोरे व सौ. लक्ष्मीबाई मोरे यांच्या पोटी जन्म |
| १९४२ | २ जून रोजी कराड येथील मराठी बोर्डिंग आवारात स्वातंत्र्यसैनिक यशवंतराव चव्हाण यांच्याशी विवाह |
| १९४२-१९४३ | ‘भारत छोडो’ आंदोलनात सक्रिय सहभाग; स्वातंत्र्यलढ्यात योगदान व तुरुंगवास |
| १९४३-१९४५ | यशवंतराव चव्हाण तुरुंगवासात असताना कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत स्वातंत्र्यलढ्याशी निष्ठा कायम ठेवली |
| १९४६ | दक्षिण सातारा मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणूक प्रचारात सक्रिय सहभाग; कार्यकर्त्यांचे संघटन व जनसंपर्क |
| १९५२ | स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या काळात कराड परिसरात महिलांशी संवाद व प्रचारकार्य |
| १९५८ | मुंबई येथील ‘सह्याद्री’ निवासस्थानी पं. जवाहरलाल नेहरू यांची भेट व सुसंवाद |
| १९६० | महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर मुख्यमंत्री निवासस्थान ‘सह्याद्री’, मुंबई येथे वास्तव्य; सामाजिक व सांस्कृतिक कार्यात सहभाग |
| १९६०-१९६२ | विविध राष्ट्रीय कार्यक्रम तसेच राणी एलिझाबेथ यांच्या स्वागत समारंभात सहभाग |
| १९६२-१९६३ | यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री झाल्यानंतर दिल्ली येथील ‘१, रेसकोर्स रोड’ येथे वास्तव्य; पं. नेहरू व इंदिरा गांधी यांचा सहवास |
| १९६३-१९८२ | इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकार्णो व लॉर्ड माउंटबॅटन यांच्याशी सुसंवाद; रशिया येथे परदेश दौऱ्यात सहभाग |
| साहित्यिक कार्य | सासुबाई विठाई यांच्या ओव्यांचे संकलन व जतन |
| १९८३ | १ जून रोजी दिल्ली येथे अनंतात विलीन |