|| Be one with downtrodden and the underprivilged ||

Shri Shivaji Education Society, Karad's - Board for Higher Education, Karad

Venutai Chavan College, Karad

Affiliated to Shivaji University, Kolhapur    |   NAAC Accredited as "B" Grade (3rd Cycle)


Hon. Late Sou Venutai Chavan

वर्ष घटना / माहिती
१९२६ २ फेब्रुवारी रोजी फलटण, जि. सातारा येथे श्री. रघुनाथराव मोरे व सौ. लक्ष्मीबाई मोरे यांच्या पोटी जन्म
१९४२ २ जून रोजी कराड येथील मराठी बोर्डिंग आवारात स्वातंत्र्यसैनिक यशवंतराव चव्हाण यांच्याशी विवाह
१९४२-१९४३ ‘भारत छोडो’ आंदोलनात सक्रिय सहभाग; स्वातंत्र्यलढ्यात योगदान व तुरुंगवास
१९४३-१९४५ यशवंतराव चव्हाण तुरुंगवासात असताना कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत स्वातंत्र्यलढ्याशी निष्ठा कायम ठेवली
१९४६ दक्षिण सातारा मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणूक प्रचारात सक्रिय सहभाग; कार्यकर्त्यांचे संघटन व जनसंपर्क
१९५२ स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या काळात कराड परिसरात महिलांशी संवाद व प्रचारकार्य
१९५८ मुंबई येथील ‘सह्याद्री’ निवासस्थानी पं. जवाहरलाल नेहरू यांची भेट व सुसंवाद
१९६० महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर मुख्यमंत्री निवासस्थान ‘सह्याद्री’, मुंबई येथे वास्तव्य; सामाजिक व सांस्कृतिक कार्यात सहभाग
१९६०-१९६२ विविध राष्ट्रीय कार्यक्रम तसेच राणी एलिझाबेथ यांच्या स्वागत समारंभात सहभाग
१९६२-१९६३ यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री झाल्यानंतर दिल्ली येथील ‘१, रेसकोर्स रोड’ येथे वास्तव्य; पं. नेहरू व इंदिरा गांधी यांचा सहवास
१९६३-१९८२ इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकार्णो व लॉर्ड माउंटबॅटन यांच्याशी सुसंवाद; रशिया येथे परदेश दौऱ्यात सहभाग
साहित्यिक कार्य सासुबाई विठाई यांच्या ओव्यांचे संकलन व जतन
१९८३ १ जून रोजी दिल्ली येथे अनंतात विलीन

scroll up