|| Be one with downtrodden and the underprivilged ||

Shri Shivaji Education Society, Karad's - Board for Higher Education, Karad

Venutai Chavan College, Karad

Affiliated to Shivaji University, Kolhapur.
NAAC Accredited as "B" Grade (3rd Cycle)


General Secretary Message

कराड हीच माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी देखील आहे. माझे शिक्षण कराडमध्येच झाले आहे. आपल्या संस्थेच्या यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स चा मी माजी विद्यार्थी आहे. तेथून स्थापत्य विशारद ही पदवी संपादन केल्यानंतर मी कराडच्या नगर परिषदेमध्ये शहर अभियंता म्हणून रुजू झालो. मी कराड परिषदेत 35 वर्षे काम केले आहे. या ३५ वर्षात पी.डी.पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहराच्या विकासात आणि कराड शहर नियोजन योजनेचा सुधारित विकास आराखडा तयार करण्याच्या पवान कार्यात सहभाग घेण्याची संधी मला मिळाली हे माझे मी सौभाग्य समजतो. भुयारी गटारी योजना हे कराडचे खास वैशिष्ट्य आहे. ही योजना तयार करण्यात देखील मी सहभागी होतो. तसेच कराडमधील यशवंतराव चव्हाण स्मृती सदन, शिवाजी स्टेडियम, व्यायामशाळा, बॅडमिंटन हॉल, सुपर मार्केट, विविध शॉपिंग सेंटर्स, भाजी मंडई इमारतींचे बांधकाम हे माझ्या कर्दितील उल्लेखनीय बाबी आहेत.

About

कराडला उत्कृष्ट सांस्कृतिक दर्जा मिळवून देणारे अनेक राष्ट्रीय नेत्यांचे पुतळे ठीक ठिकाणी आहेत.कराडमध्ये प्रवेश करताना समोर दिसणारा महात्मा गांधीजी यांचा पुतळा, कराडचे वैभव असलेले दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, तसेच कराड मधील इतर पुतळे यांच्य उभारणीत माझा देखील खारीचा वाटा आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.


ज्या कराड नगरीतून आपल्या देशकार्याची सुरुवात झाली त्याच कराड नगरीमध्ये आपण अखेरचा श्वास घ्यावा अशी यशवंतराव चव्हाण साहेबांचे इच्छा होती. त्यांच्या मृत्यूनंतर आदरणीय पी डी पाटील साहेब यांनी येथील कृष्णा कोयनेच्या संगमावर साहेबांचे चिरंतन स्मारक बांधले आणि अतिशय सुंदर असे उद्यानही माझ्या कारकिर्दीत तयार करून घेतले हीच माझी चव्हाण साहेबांना वाहिलेली श्रद्धांजली आहे असे मी मानतो. कराड नगरीचे शिल्पकार आदरणीय पी डी पाटील साहेब यांचा सहवास, त्यांंचे मार्गदर्शन मला मिळाले, त्यांच्या सहवासात ज्यांची जडणघडण झाली अशा नशीबवान व्यक्तींपैकी मी एक आहे असे मला वाटते.


मी शिवजी शिक्षण संस्थेचा सदस्य म्हणून कार्यरत होतेच. त्यानिमित्ताने या दोन्ही महाविद्यालयांचे विविध उपक्रम आणि विकासकामांमध्ये मी सहभागी होतो. व आता माझी जनरल सेक्रेटरीपदी निवड झाली आहे. मी संस्थेने माझ्यावर सोपवलेली जबाबदारी प्रामाणिक पने पार पाडण्याचा प्रयत्न सदैव करेन.


अल्ताफ हुसेन नसरुद्दिन मुल्ला,
जनरल सेक्रेटरी, श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, विद्यानगर, कराड



scroll up